प्रतिनिधी / अक्कलकोट
अक्कलकोट तालुक्यातील एका गावात विवाहित महिलेस मनाला लज्जा वाटेल असे कृत्य करून विनयभंग केल्याने व पिडीताच्या पतीस दगडाने मारहाण केल्याप्रकरणी दि २८ रोजी उमेश सुरेश कोळी रा. शिरसी ता. अक्कलकोट याच्या विरोधात अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, दि २४ ऑगस्ट रोजी दुपारच्या दरम्यान पीडितेच्या मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केले यावेळी पीडितेने आरडाओरडा केला असता संशयित आरोपीने पळ काढला. त्यानंतर पीडिता,पती व भाऊ हे उमेश कोळी यास घडलेल्या प्रकाराबद्दल विचारणा करण्यासाठी आरोपीच्या घरासमोर गेले असता आरोपीने “मी काय करायचे ते करतो तू कोण विचारणारा असे म्हणत धमकी देऊन शिवीगाळ केली.
तसेच बाजूला पडलेल्या दगडाने पीडितेच्या पतीस हातावर मारून जखमी केले म्हणून पीडितेने संशयित आरोपी उमेश सुरेश कोळी रा. शिरसी ता. अक्कलकोट याच्या विरोधात अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार विपीन सुरवसे हे करीत आहेत.