तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापुर
सोलापुर शहारात शनिवारी रात्री साडेआठ वाजेपर्यंत 83 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले. उपचारा दरम्यान 4 जणांचा मृत्यू झाला तर बरे झाल्याने तब्बल 36 जनांना घरी सोडले असल्याची माहिती मनपा आरोग्य अधिकारी डॉ. मंजिरी कुलकर्णी यांनी शनिवारी दिली.
सोलापुर शहरात शनिवारी 349 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 83 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह तर 266 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 83 पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये 48 पुरुष तर 35 स्त्रियांचा समावेश आहे. शहरातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2582 झाली आहे. तसेच उपचारादरम्यान 4 जणांचा मृत्यू झाला. तर बरे झाल्याने 36 जनांना घरी सोडण्यात आले.
एकूण तपासणी केलेल्या व्यक्ती : 13321
सोलापूर शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती : 2582
आजपर्यंत एकूण मृतांची संख्या : 267
रुग्णालयात दाखल असलेल्या बांधितांची संख्या : 895
रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेले बाधितांची संख्या : 1420
प्राप्त तपासणी अहवाल : 13133
प्रलंबित तपासणी अहवाल : 188
निगेटिव्ह अहवाल : 10551
Previous Article‘मान्सूची’ जलसंजीवनी
Next Article बेळगाव जिल्ह्यात कोरोनामुळे दोघांचा मृत्यू
Abhijeet Khandekar
Meet Abhijeet Khandekar : a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. With a Master's degree in Journalism from Shivaji University, Abhijeet specializes in political news, entertainment, and local content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives. Connect with Abhijeet for collaborations and captivating content that informs and entertains.