प्रतिनिधी / सोलापुर
सोलापुर शहारात गूरुवारी रात्री ९ वाजेपर्यंत ८४ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले. उपचारा दरम्यान ५ जणांचा मृत्यू झाला तर बरे झाल्याने तब्बल ७३ जनांना घरी सोडले असल्याची माहिती मनपा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव यांनी गूरुवारी दिली.
सोलापुर शहरात गूरुवारी १६३ जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील ८४ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह तर ७९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. ८४ पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये ४९ पुरुष तर ३५ स्त्रियांचा समावेश आहे. शहरातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ३०२६ झाली आहे. तसेच उपचारादरम्यान ५ जणांचा मृत्यू झाला. तर बरे झाल्याने ७३ जनांना घरी सोडण्यात आले.
-एकूण तपासणी केलेल्या व्यक्ती : १४८८३
सोलापूर शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती : ३०२६
-आजपर्यंत एकूण मृतांची संख्या : २९२
-रुग्णालयात दाखल असलेल्या बांधितांची संख्या : ११२६
-रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेले बाधितांची संख्या : १६०७
-प्राप्त तपासणी अहवाल : १४३९९
-प्रलंबित तपासणी अहवाल : ४३९
-निगेटिव्ह अहवाल : ११३७३