तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापुर
सोलापुर शहारात शुक्रवारी रात्री साडेआठ वाजेपर्यंत 4 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले तर 6 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी शुक्रवारी दिली.
सोलापुर शहरात शुक्रवारी 97 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 4 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह तर 93 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 4 पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये 1 पुरुष तर 3 स्त्रियांचा समावेश आहे. शहरातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2084 झाली आहे. तसेच उपचारादरम्यान 6 जणांचा मृत्यू झाला. तर बरे झाल्याने 13 जनांना घरी सोडण्यात आले.
कूण तपासणी केलेल्या व्यक्ती : 11245
सोलापूर शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती : 2084
आजपर्यंत एकूण मृतांची संख्या : 234
रुग्णालयात दाखल असलेल्या बांधितांची संख्या : 751
रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेले बाधितांची संख्या : 1099
प्राप्त तपासणी अहवाल : 11245
प्रलंबित तपासणी अहवाल : 00
निगेटिव्ह अहवाल : 9161