सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर शहारात दिवसेंदिवस कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या वाढत असुन रविवारी रात्री 9 वाजेपर्यंत तब्बल 106 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले. उपचारा दरम्यान 4 जणांचा मृत्यू झाला तर बरे झाल्याने 5 जनांना घरी सोडले असल्याची माहिती मनपा आरोग्य अधिकारी डॉ. मंजिरी कुलकर्णी यांनी दिली.
सोलापूर शहरात रविवारी 339 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 106 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह तर 233 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 106 पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये 63 पुरुष तर 43 स्त्रियांचा समावेश आहे. शहरातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2688 झाली आहे. तसेच उपचारादरम्यान 4 जणांचा मृत्यू झाला. तर बरे झाल्याने 5 जनांना घरी सोडण्यात आले.
-एकूण तपासणी केलेल्या व्यक्ती : 13660
सोलापूर शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती : 2688
-आजपर्यंत एकूण मृतांची संख्या : 271
-रुग्णालयात दाखल असलेल्या बांधितांची संख्या : 993
-रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेले बाधितांची संख्या : 1424
-प्राप्त तपासणी अहवाल : 13472
-प्रलंबित तपासणी अहवाल : 188
-निगेटिव्ह अहवाल : 10784