एकाच दिवशी जिल्ह्यात २४ जणांचा मृत्यू
तरुण भारत संवाद प्रतिनिधी सोलापूर :
सोलापूर शहरात शनिवारी 27 तर ग्रामीण भागात 801नवीन कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. तर शहर जिल्ह्यात एकाच दिवशी 24 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. दरम्यान शहर, जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या, मृत्यूचे प्रमाण हळूहळू कमी होत आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण, नगरपालिका भागात आज नव्या 801 कोरोनाबाधितांची भर पडली असून एकाच दिवशी 24 रुग्णांचा मृत्यू तर 1379 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. 801 पैकी 466 पुरुष, 335 स्त्रियांचा समावेश आहे. तर आतापर्यंत 2564 जणांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण 1 लाख 22 हजार 263 कोरोनाबाधित रुग्ण झाले आहेत. उर्वरित 7 हजार 717 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव यांनी दिली. जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने आज कोरोनाबाधितांचा अहवाल दिला आहे. आज 7638 जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील 6837 अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 801 पॉझिटिव्ह आढळल्या आहे. आतापर्यंत 2564 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण 1 लाख 11 हजार 982 जण बरे होऊन घरी गेली आहेत.
सोलापुर शहरात नव्याने 27 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. 61 रुग्ण बरे होऊन घरी परतले तर उपचारादरम्यान 1 रुग्णाचा मृत्यु झाल्याची माहिती मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली. सोलापुर शहरात 1949 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 27 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर 1922 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 27 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 17 पुरुष तर 10 स्त्रियांचा समावेश आहे. शहरातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 28 हजार 130 झाली आहे.