मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांची माहिती
बरे झाल्याने 53 रुग्णांना सोडले घरी
तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर शहारात सोमवारी नव्याने 28 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. उपचारादरम्यान तीन रुग्णांचा मृत्यू झाला, तर उपचार घेऊन बरे झाल्याने 53 जणांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी सोमवारी दिली.
सोलापूर शहरात सोमवारी 233 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 28 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह तर 205 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 28 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 15 पुरुष तर 13 स्त्रियांचा समावेश आहे. शहरातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 7528 झाली आहे.
एकूण तपासणी केलेल्या व्यक्ती : 72322
शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती : 7528
प्राप्त तपासणी अहवाल : 72322
प्रलंबित तपासणी अहवाल : 00
निगेटिव्ह अहवाल : 64794
एकूण मृतांची संख्या : 446
उपचारात असलेले 794
बरे झालेल्यांची संख्या 6288