तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर शहरात सोमवारी दुपारी दोनपर्यंत 29 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. उपचारा दरम्यान दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली. शहरात रविवारी 100 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 29 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह, तर 71 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. यामध्ये 14 पुरुष तर 15 महिलांचा समावेश आहे. रुग्णांची संख्या 3 हजार 835 झाली आहे.
शहरातील संख्या
एकूण तपासणी 19 हजार 243
पॉझिटिव्ह रुग्ण 3 हजार 835
प्राप्त तपासणी अहवाल 19 हजार 232
प्रलंबित तपासणी अहवाल 11
निगेटिव्ह अहवाल 15 हजार 397
आजपर्यंत एकूण मृतांची संख्या 327
रुग्णालयात दाखल बांधितांची संख्या 1 हजार 406
रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेले 2 हजार 102
माढा तालुक्मयात 12 जण पॉझिटीव्ह
कुर्डूवाडी माढा तालुक्मयात आज सोमवारी एकूण 12 जण पॉझिटीव्ह असून रिधोरे येथे 9 जणांना तर कुर्डूवाडी शहरातील तीघा जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाची माढा तालुक्मयातील एकूण संख्या 85 वर पोहचली आहे. कोरोनाने आता कुर्डूवाडी येथील रेल्वे लोहमार्ग पोलिस ठाण्यात देखील प्रवेश केला असून पोलिस ठाण्यातील एका अधिकारी, कर्मचाऱयासह शहरातील आणखी एकास असे एकूण तीघा जणांना कोरनाची लागण झाली असल्याचे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. संतोष अडागळे यांनी सांगितले.
मोहोळ तालुक्मयात सापडले 8 रुग्ण
मोहोळ तालुक्यात सापडले 8 कोरोना बाधित रुग्ण सापडले. कामती -2, कोळगाव-1, मोहोळ शहर-5 अशी संख्या आहे. ग्रामीण भागात संख्या 96 झाली आहे तर शहरात पूर्वीचे पंचावन्न मिळवून आताचे आठ रुग्ण अशी एकूण 156 रूग्ण संख्या झाली आहे.
संचारबंदीमुळे भाजीपाल्याच्या वाहनांना ब्रेक
शहर-जिह्यातील 31 गावांमध्ये गुरुवारी मध्यरात्रीपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे सोलापूर शहरात मोठय़ा प्रमाणावरशेतकरी भाजीपाला विक्रीसाठी येतात. मात्र संचारबंदीच्या 10 दिवसांच्या काळात भाजी मार्केट बंद असल्याने भाजीपाला विक्री करणाऱया वाहनांनादेखील ब्रेक लागला आहे. सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठय़ा प्रमाणावर भाजीपाला, फळे विक्री करण्यासाठी आणत असतात. मात्र संचारबंदी असल्याने भाजीपाला विक्री थांबली आहे. त्याचबरोबर वाहनांना देखील ब्रेक लागला आहे. शेतमाल निर्यात करणारी साखळी विस्कळीत झाली असल्याने जवळपास 30 ते 35 टक्के शेतकऱयांचे नुकसान झाले आहे.
वाहतुकीच्या खर्चातही वाढ – बापू रणदिवे, वाहनचालक
कोरोनामुळे शेतमालाच्या निर्यातीवर संचारबंदीचा परिणाम झाला आहे. या परिस्थितीत भाजीपाला विक्रीदेखील पुढील दहा दिवस थांबली आहे. त्याचबरोबर मजूर वाहनचालक उपलब्ध नसल्याने वाहतुकीचा खर्चदेखील वाढला आहे. त्यामुळे दहा दिवसानंतर सर्व परिस्थिती पूर्ववत सुरू होण्याची शक्मयता आहे.
सोलापूर ग्रामीणमध्ये 171 रुग्णांची भर
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात सोमवार 171 कोरोनाबाधित पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये 105 पुरुष, 66 स्त्रियांचा समावेश आहे. आज 1 आतापर्यंत 45 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण 1994 कोरोबधित रुग्ण झाले आहेत. उर्वरित 1345 रुग्णांवर उपचार सुरू आहेत अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बी.टी जमादार यांनी सोमवारी दिली.
आजचे कोरोनाबाधित रुग्ण मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, पंढरपूर, बार्शी, सांगोला, , माढा, माळशिरस तालुक्यातील आहेत. जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने आज कोरोना बाधितांचा अहवाल दिला आहे. आज 1495 जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील 1324 अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 171 पॉझिटिव्ह आढळल्या आहे . 1994 रुग्णांपैकी 1241 पुरुष 753 स्त्री आहेत. तालुक्यात तर आतापर्यंत 45 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण 1345 जण बरे होऊन घरी गेली आहेत.
कोरोनाबाधितांची संख्या पुढीलप्रमाणे
अक्कलकोट – 359
मंगळवेढा- 52
बार्शी – 489
माढा- 75
माळशिरस – 89
मोहोळ- 149
उत्तर सोलापूर – 171
करमाळा- 25
सांगोला – 13
पंढरपूर149
दक्षिण सोलापूर – 423
एकूण 1994
होम क्वांरटाईन – 2618
आजपर्यंत तपासणी केलेली व्यक्ती- 14610
प्राप्त अहवाल- 14514
प्रलंबित अहवाल- 96
एकूण निगेटिव्ह – 12521
कोरोनाबाधितांची संख्या- 1994
रुग्णालयात दाखल – 1345
आतापर्यंत बरे – 604
मृत – 45