मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांची माहिती
बरे झाल्याने ६४ रुग्णांना सोडले घरी
तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर शहारात शुक्रवारी नव्याने ५९ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले. उपचारादरम्यान चार रुगांचा मृत्यू झाला, तर उपचार घेऊन बरे झाल्याने 64 जणांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी शुक्रवारी दिली.
सोलापूर शहरात शुक्रवारी 490 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 59 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर 431 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 59 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 36 पुरुष तर 23 स्त्रियांचा समावेश आहे. शहरातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 7363 झाली आहे.
एकूण तपासणी केलेल्या व्यक्ती : 70947
शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती : 7363
प्राप्त तपासणी अहवाल : 70947
प्रलंबित तपासणी अहवाल : 00
निगेटिव्ह अहवाल : 63584
एकूण मृतांची संख्या : 440
उपचारात : 799
बरे झालेल्यांची संख्या : 6124