सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर शहारात आज 126 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले. तर बरे झाल्याने 39 जनांना घरी सोडण्यात आले. शहरात दिवसभरात 4 जणांचा कोरोनाने मृत्यू झाल्याची माहिती मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली.
सोलापूर शहरात गुरुवारी 999 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 126 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह तर 876 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 126 पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये 58 पुरुष तर 68 स्त्रियांचा समावेश आहे. शहरातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 4178 झाली आहे. तसेच उपचारादरम्यान 4 जणांचा मृत्यू झाला.
-एकूण तपासणी केलेल्या व्यक्ती : 21589
-शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती : 4178
-प्राप्त तपासणी अहवाल : 22243
-प्रलंबित तपासणी अहवाल : 346
-निगेटिव्ह अहवाल : 18065
-आजपर्यंत एकूण मृतांची संख्या : 337
-रुग्णालयात दाखल असलेल्या बांधितांची संख्या : 1540
-रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेले बाधितांची संख्या : 2301