75 जण बरे होऊन घरी परतले, एकूण रुग्णांची संख्या 5 हजार 239
तरुण भारत संवाद प्रतिनिधी/सोलापूर
सोलापूर शहरातील 49 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले असून उपचारा दरम्यान 2 जणांचा मृत्यू तर बरे होऊन 75 जण बरे होवून घरी परतले असल्याची माहिती मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली.
आज, 678 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 49 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह तर 629 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 49 पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये 20 पुरुष तर 29 स्त्रियांचा समावेश आहे. शहरातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 5239 झाली आहे.
-एकूण तपासणी केलेल्या व्यक्ती : 37349
-शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती : 5239
-प्राप्त तपासणी अहवाल : 37084
-प्रलंबित तपासणी अहवाल : 265
-निगेटिव्ह अहवाल : 31845
-आजपर्यंत एकूण मृतांची संख्या : 369
-रुग्णालयात दाखल असलेल्या बांधितांची संख्या : 1417
-रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या बाधितांची संख्या : 3453