मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांची माहितीबरे झाल्याने 73 रुग्णांना सोडले घरी
तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर शहारात मंगळवारी नव्याने 68 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. उपचारादरम्यान दोन रुग्णांचा मृत्यू झाला, तर उपचार घेऊन बरे झाल्याने 73 जनांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी मंगळवारी दिली.
सोलापूर शहरात मंगळवारी 599 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 68 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर 531 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 68 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 38 पुरुष तर 30 स्त्रियांचा समावेश आहे. शहरातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 7596 झाली आहे.
एकूण तपासणी केलेल्या व्यक्ती : 72921
शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती : 7596
प्राप्त तपासणी अहवाल : 72921
प्रलंबित तपासणी अहवाल : 00
निगेटिव्ह अहवाल : 65325
आजपर्यंत एकूण मृतांची संख्या : 448
उपचारात असलेल्यांची संख्या : 787
बरे झालेल्याची एकूण संख्या : 6361