सोलापूर / प्रतिनिधी
शहर पोलीस आयुक्तालयातील सहायक पोलीस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्यांचे आदेश पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी दिले आहेत. विभाग दोनच्या सहायक पोलीस आयुक्त डॉ. प्रीती टिपरे यांची शहर गुन्हे शाखला वर्णी लागली आहे.
शहर पोलीस आयुक्तालयामध्ये सहायक पोलीस आयुक्तांची सात पदे आहेत. त्यातील काही पदे गेल्या अनेक महिन्यांपासून भरली नव्हती. त्यामुळे अन्य अधिकार्यांकडे अतिरिक्त पदभार होता. काही दिवसांपूर्वी राज्यातील सहायक आयुक्तपदाच्या अधिकार्यांच्या गृह विभागाने बदल्या केल्या होत्या. त्यामध्ये शहर पोलिस आयुक्तालयामध्ये नवे अधिकारी आले आहेत. गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त अभय डोंगरे यांची बदली झाल्यापासून प्रभारी अधिकार्यावर गुन्हे शाखेचा कारभार सुरु होता. परंतु आता पूर्णवेळ अधिकारी गुन्हे शाखेला मिळाल्याने गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण वाढण्याची आशा आहे.
अन्य सहायक पोलीस आयुक्त व कंसात बदलीचे ठिकाण : विशेष शाखेचे दीपक आर्वे (शहर वाहतूक शाखा), नव्याने हजर झालेले डॉ. संतोष गायकवाड (विभाग 1), विभाग एकचे माधव रेड्डी (विभाग 2), शहर वाहतूक शाखेचे अनिल लंभाते (विशेष शाखा) यांची बदली झाली. तर प्रशासनाची जबाबदारी प्रांजली सोनवणे व नियत्रंण कक्षाची अजय परमार यांच्याकडेच ठेवण्यात आली आहे.