सोलापूर / प्रतिनिधी
राज्यातील पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक यांच्या बदल्यांचे आदेश आस्थापना विभागाचे अपर पोलीस महानिरीक्षण संचालक संजीवकुमार सिंघल यांनी दिले आहेत त्यामध्ये शहर व जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
केगाव पोलीस प्रशिक्षण केंद्रातील पोलीस निरीक्षक विजयालक्ष्मी कुरली, औरंगाबाद ग्रामीण मधील सय्यद शौकत साबी यांचे सोलापूर शहरात, हिंगोली येथून पोलीस निरीक्षक कृष्णदेव पाटील हे सोलापूर ग्रामीण मध्ये, नागपूर येथून दिपक पाटील यांची पोलीस प्रशिक्षण केंद्र केगाव येथे बदली झाली आहे.
तर शहर पोलिस आयुक्तालयातील पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील यांची गुन्हे अन्वेषण विभागात, संजय पाटील यांची पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची सांगली येथे, केगाव पोलीस प्रशिक्षण केंद्रातील अरुण आव्हाड यांची अहमदनगर येथे, ग्रामीण पोलिस दलातील संतोष गिरीगोसावी यांची दौंड येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रात बदली झाली आहे.