वार्ताहर / बेंबळे
माढा तालुक्यातील शिराळ येथील संजय मारुती काळे यांचा अज्ञात मारेक-यांनी धारधार शस्ञांनी अतिशय क्रुरपणे खून करुन मृतदेह टमटमसह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला असल्याची घटना शेवरे ता. माढा येथील टेंभर्णी-अकलूज रोडजवळील उजनी डावा उजवा कालव्याच्या साईटपट्टीला रविवारी सकाळी उघडकीस आली आहे. टेंभुर्णी पोलिस ठाण्यात अज्ञांताविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की शिराळ ता. माढा येथील संजय मारुती काळे वय ५४ हे खारी, टोस्ट बेकरीचा व्यवसाय करत होते. मिळालेल्या माहिती नुसार संजय काळे हे शनिवार दि. २५ रोजी सायंकाळी जेवण करून घराबाहेरील आपल्या अंगणात झोपले होते. शनिवार मध्यरात्री ते रविवार पहाटेच्या दरम्यान ते आपले छोटाहत्ती एम एच ४५-६५७७ मालवाहतूक वाहन घेऊन, घरी कोणालाही न सांगता घराबाहेर पडले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
रविवारी सकाळी सात वाजता शेवरे ता. माढा येथे उजनी कालव्याचा उजव्या बाजूचा रस्त्या लगत टेंभुर्णी – अकलूज रोड पासून आतमध्ये अंदाजे सहाशे फुट अंतरावर शेवरे येथील जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना छोटा हत्ती वाहन पूर्णपणे जळालेल्या आवस्थेत दिसून आले काही नागरीकांनी जवळ जाऊन पाहिले असता. अर्धवट जळालेल्या आवस्थेत दिसून शरीराचे छातीपासून थोडा वरचा भाग शीर व एक हात शाबूत होता. बाकी शरीर पुर्णपणे जळून खाक झाले होते. चेहऱ्यावर धारदार शस्ञाने वार केलेल्या खूना डाव्या बाजूचा कान तुटल्यासह जखमा दिसून आल्या आहेत.
काळे यांचा किरकोळ सावकारकीचाही व्यवसाय असल्याचे येथील नागरीकांतून चर्चा आहे तर असा इतका निर्दयपणे खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह टमटमसह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करून आरोपींनी टेंभुर्णी पोलीसांसमोर अवाहन उभे केले आहे. निर्घून खून मृतदेह धडाचे खाली जळून खाक, देहाचे झाले अनेक तुकडे मारेक-यांनी मयत संजय काळे याचा खून इतका क्रुरपणे केला आहे. सदर प्रकरणी टेंभुर्णी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास सुरू आहे.
Previous Articleपुणे : मंडई गणपतीची यंदा मंदिरातच प्रतिष्ठापना
Abhijeet Khandekar
Meet Abhijeet Khandekar : a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. With a Master's degree in Journalism from Shivaji University, Abhijeet specializes in political news, entertainment, and local content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives. Connect with Abhijeet for collaborations and captivating content that informs and entertains.