तुळजापूर / प्रतिनिधी
श्री क्षेत्र तुळजापूर येथील पुण्य पावन नगरीतील श्री तुळजाभवानी मंदिरातील नंदीबुवा ओवरीत श्री लक्ष्मी नरसिंह मंदिर असून परंपरेनुसार 643 वा जन्मोत्सव दिनांक 25/05/2021 मंगळवार रोजी साजरा करण्यात आला.
श्री लक्ष्मी नरसिंह देव जन्मोत्सव निमित्त पवमान पंचसूक्त,पुरुष सुक्त, श्रीसुक्त या मंत्राने अभिषेक करण्यात आला, व सायंकाळी ७ वाजता जन्मकाली हिरण्यकश्यपू वध हा अवतार देण्यात आला व डाळ व आंब्याचे पन्हे व नैवेद्य देवास दाखवून मंगलारती करण्यात आली , तसेच बटू पूजन, सुवासिनी पूजन करण्यात आले.
यावेळी नरसिंह मंदिर पुजारी श्रीराम नंदीबुवा, श्रीहरी नंदीबुवा, श्रीकृष्ण नंदीबुवा, सखाराम नंदीबुवा, देविदास नंदीबुवा, राजाराम नंदीबुवा नागेशशास्त्री नंदीबुवा, श्रीतुळजाभवानी मंदिर संस्थानचे धार्मिक व्यवस्थापक सिद्धेश्वर इंतुले, मंदिर संस्थानचे महंत तुकोजीबुवा,वाकोजीबुवा, हमरोजी बुवा हे सर्व शासनाच्या कोविड 19 नियमानुसार पालन करून हजर होते.