बोरगाव/प्रतिनिधी
अक्कलकोट तालुक्यातील नागणसुर दुरक्षेत्र हद्दीत पोलीस गस्त घालत असताना कडबगाव येथील मल्लिकार्जुन मंदिराजवळ असलेल्या किराणा व कापड दुकानदारावर संचारबंदीचे उल्लंघन केल्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मल्लिकार्जुन किराणा दुकान चालक चनबसप्पा सिद्धप्पा देशेट्टी व श्रीकांत कापड दुकान मालक बसवराज सिद्धप्पा तोरगणी आणि सेवालाल नगर तांडा डिग्गेवाडी येथील किराणा दुकानदार रतन थावरु राठोड या दुकानदारांवर गुन्हा दाखल करण्यात आले.
सोलापूरचे
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर
यांच्या आदेशानुसार अक्कलकोट
तालुक्यात शुक्रवार (दि-२४)
ते रविवार (२६)
असे तीन दिवस कडक बंदी
लागू करण्यात आला आहे. याच्या
पहिल्याच दिवशी अक्कलकोट
तालुक्यातील कडबगाव व डिग्गेवाडी
तांडा येथील दुकानदारावर
रात्री ९ वाजेपर्यंत दुकान
चालू ठेवल्यामुळे भादविका
क १८८ प्रमाणे वेगवेगळी एकूण
तीन गुन्हे अक्कलकोट दक्षिण
पोलीस ठाण्यात दाखल करण्यात
आले. संपूर्ण संचारबंदी
वेळी फक्त मेडिकल दुकाने चालू
राहतील आणि इतर कोणतेही व्यवहार
चालू राहणार नाहीत असा आदेश
असताना किराणा व कापड दुकान
चालू ठेवल्यामुळे दुकान
चालकांवर गुन्हा दाखल झाल्याने
तालुक्यात चर्चेला उधाण आले
आहे. सदरची कारवाई
सपोनि तुकाराम राठोड, पो
हे कॉ मल्लिनाथ कलशेट्टी,
पो ना सुभाष दासरे,
पो कॉ अजयसिंह शिंदे,
पो कॉ भाऊकांत सरवदे
यांनी केली.