प्रतिनिधी /आटपाडी
आटपाडी तालुक्यातील 56 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत शुक्रवार दिनांक 29 जानेवारी रोजी होणार असल्याची माहिती तहसीलदार सचिन लंगुटे यांनी दिली. आटपाडी पंचायत समितीच्या सभागृहात दुपारी तीन वाजता सरपंच पद आरक्षण सोडतीसाठी तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहनही तहसीलदारांनी केले आहे.
सरपंचपदाच्या आरक्षणाच्या सोडतीचा दिवस निश्चित झाल्याने नुकत्याच पार पडलेल्या दहा ग्रामपंचायतीच्या निवडणूक कार्यक्रमांसह तालुक्यातील सर्वच गावाच्या गाव पुढाऱ्यांचे लक्ष सोडतीकडे लागले आहे.