प्रतिनिधी / सोलापूर
बुलढाणा जिल्ह्यातील चिखली ठिकाणी सह दुय्यम निबंधक वर्ग यांना आज दुपारी 11 नोव्हेंबर रोजी शिवीगाळ व मारहाण केल्याच्या निषेधार्थ सोलापुरातील सह दुय्यम निबंधक वर्ग कार्यालयात कामकाज बंद ठेवून निषेध व्यक्त करण्यात आला. शासकीय अधिकार्यावर मारहाण होते. घटनेचा निषेध व्यक्त करीत मारहाण करणाऱ्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी यावेळी संघटनेच्यावतीने करण्यात आली.
बुलढाणा जिल्ह्यातील मारहाणीची वर्ता कळताच जिल्ह्यासह राज्यभरात पडसाद उमटले आहेत. दरम्यान सोलापुरातील सह दुय्यम निबंधक वर्ग क्रमांक 1, 2, 3 या कार्यालयाच्याबाहेर अचानक नोटिसा लागल्या, लोखंडी गेट बंद करण्यात आले. कर्मचाऱ्यांनी लेखणी म्हणजेच कॉम्प्युटरवरील कामकाज थांबवले. शहर जिल्ह्यातून दस्त नोंदणीसाठी आलेल्या उपस्थित नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. अचानक दस्त नोंदणी करणारे रजिस्टर ऑफिस अचानक बंद झाल्यामुळे कार्यालयाबाहेर नागरिकांची मोठी गर्दी होती.
दरम्यान निषेध व्यक्त करण्यासाठी नोंदणी व मुद्रांक विभाग राज्यपत्र संघटनेचे प्रमुख के.पी. कन्ना, ए. आर.अत्तार, जी.बी. मिसाळ, ए. ए. इनामदार, रोकडे, ए. आर. राठोड, एस आर विटकर , टी. एस आंबेकर यांच्यासह पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
मारहाण करणाऱ्यावर कडक कारवाई करा
सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालयातील कर्मचार्यांवर हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. अशा घटना पुन्हा घडू नये म्हणून आम्ही आंदोलन करीत आहोत. जोपर्यंत मारहाण करणाऱ्यावर पोलिसांकडून कारवाई होत नाही तोपर्यंत कामकाज बंद आंदोलन सुरूच राहणार. पोलिसांनी मारहाण करणाऱ्या वर तात्काळ अटक करून गुन्हा दाखल करावा. के.पी. कन्ना, अध्यक्ष – सहाय्यक दुय्यम निबंधक संघटना, सोलापूर