ऑस्ट्रेलियाच्याजवळ प्रशांत महासागरात सोलोमन बेटांचा समूह आहे. या बेटांवर काही दिवसांपूर्वी लहान मुलाच्या आकाराचा महाकाय बेडूक आढळून आला आहे. याचे वजन साधारणतः दीड किलो आहे. नुकत्याच जन्मलेल्या बालकाचे वजनही एवढे असू शकते. शास्त्राrय भाषेत हा बेडूक ‘कोरनूफेर गुप्पी’ या प्रजातीचा असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. गेल्या शंभर वर्षांमध्ये इतक्मया मोठय़ा बेडकाचे दर्शन संशोधकांना प्रथमच झाल्याने त्यांच्यात उत्साह संचारला आहे.
‘आमच्या आयुष्यात इतका मोठा बेडूक आम्ही कधीच पाहिला नव्हता’, अशी प्रतिक्रिया अनेक संशोधकांनी व्यक्त केली. आकाराने मोठा असला तरी हा बेडूक अत्यंत चपळ असल्याने त्याला हाताने पकडणे जवळपास अशक्मय असते. त्यामुळे आतापर्यंत तो ग्रामस्थांच्या हातून वाचला असावा. या बेडकांची संख्या फार मोठी नाही. त्यांचे संवर्धन करणे आवश्यक आहे. अशातऱहेचे मोठे बेडूक न्यू ब्रिटनपासून सोलोमन द्विपसमूहापर्यंत बऱयाच ठिकाणी आढळतात. त्यांचे संवर्धन न केल्यास ही प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.