गावोगावच्या जत्रा-यात्रांना या चैत्र वैशाखात उधाण येते. अशा जत्रा, यात्रांमध्ये येणारी धमाल अनेकांनी अनुभवली असेलच. समाजातील अशा परंपरा सिनेमांच्या पडद्यावरही चित्रित करण्याचा मोह रुपेरी दुनियेतील कलाकारांना आवरता येत नाही. गावातील राजकारणापासून ते समाजकारणापर्यंत अनेक गोष्टी या जत्रांच्या निमित्ताने उजेडात येत असतात. अशाच स्टोरीलाईनवर 16 वर्षांनी पुन्हा एक जत्रा भरणार आहे आणि ही जत्रा ‘हय़ालागाड आणि त्यालागाड’ या दोन ऑनक्रिन गावात प्रेक्षकांना घेऊन जाणार आहे. सिनेमा आणि मालिकांच्या सिक्वेलचा गेल्या काही वर्षात ट्रेंड आला आहे. याच ट्रेंडमध्ये आता लवकरच 16 वर्षांपूर्वी पडद्यावर झळकलेल्या सिनेमाचा सिक्वेल येणार आहे. जत्रा हा सिनेमा नव्या भागातील नवी कथा घेऊन मनोरंजन करायला येणार असल्याची घोषणा या सिनेमाच्या टीमने केल्यापासून चाहत्यांनाही उत्सुकता लागली आहे.
सोशल मीडियावर ‘जत्रा 2’चे मोशन पोस्टर शेअर करत केदार शिंदे यांनी एक सुरेख कॅप्शन केली आहे. ह्यालागाड आणि त्यालागाडची जत्रा आनंदमयी झाली त्याला 16 वर्षांहून जास्त काळ लोटलाय.. कोंबडी पळून सुद्धा आता बरीच वर्ष झाली आहेत.. पण अजूनही तुमचा ताब्या आमच्या राजुत आहे! म्हणूनच या गुढीपाव्यानिमित्त तुम्हा सर्व रसिकांसाठी एक आनंदाची बातमी घेऊन येतोय.. आपलं ठरलय.. तुमच्यासाठीच ठरवल आहे.. आम्ही सगळे मिळून तुमच्यासाठी आनंदाची मेजवानी घेऊन येतोय.. या नवीन वर्षात तुम्हाला हसवायला ‘जत्रा 2’ येतोय! अशी पोस्ट शेअर करत केदार शिंदेंनी दुसरा भागाचा व्हिडीओ शेअर केलाय.