सोसाटय़ांच्या वाऱयांमुळे तुटला काचेचा पूल , 330 फूट उंचीवर लटकला एक व्यक्ती
चिनी सामग्री बेकार असते हे वाक्य आपण वारंवार ऐकत असतो. याचीच काहीशी जाणीव करून देणारी एक घटना चीनमध्येच घडली आहे. लाँगजिंग शहरात पियांग माउंटनवर तयार करण्यात आलेल्या एका काचेच्या पूलाला अचानक तडा गेला. हा पूल पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. 330 फूटांच्या उंचीवरून खालील दृश्य पाहणे अत्यंत विलोभीय असते. पण काही दिवसांपूर्वी पर्यटक या पुलावर फिरत असताना अचानक याला तडा गेला आहे.
या घटनेची छायाचित्रे समाजमाध्यमांवर प्रसारित होत आहेत. सोसाटय़ाच्या वाऱयांमुळे पुलाला तडा गेला होता. यादरम्यान एक व्यक्ती पुलावर अडकून पडला. पुलाखाली 330 फूट खोल दरी होती. या घटनेवेळी 90 मैल प्रतितासाच्या वेगाने वारे वाहत होते.
हा व्यक्ती काही काळापर्यंत पुलावरच अडकून पडला होता. तो स्वतःला वाचविण्यासाठी सरपटत पुढे जात होता. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन अधिकारी आणि पोलीस त्याच्या मदतीसाठी धावून आले. त्यांनी या व्यक्तीला वाचवून रुग्णालयात दाखल केले आहे.