जिल्हाधिकाऱयांकडे पिग्मी कलेक्टर्स यांची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
पिग्मी भरलेल्या ग्राहकांची पिग्मी परत द्यावी, या मागणीसाठी नदाफ पिंजार पेडिट सौहार्द सहकारी सोसायटीच्या पिग्मी कलेक्टर्सनी जिल्हाधिकाऱयांना निवेदन दिले. गेल्या दीड ते दोन वर्षांपासून सोसायटी बंद आहे. त्यामुळे आम्ही पिग्मी कलेक्टर्स अडचणीत आलो आहे. तेंव्हा तातडीने ती रक्कम परत द्यावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली.
नदाफ पिंजार पेडिट सौहार्द सोसायटी गेल्या दोन वर्षांपासून बंद झाली आहे. गेल्या 20 वर्षांपासून आम्ही या सोसायटीमध्ये पिग्मी जमा करून भरत होतो. त्यामुळे अनेकांची रक्कम या सोसायटीमध्ये बाकी आहे. ठेवीदारही ठेव मागण्यासाठी जात आहेत. मात्र त्यांना आणखी थोडे दिवस थांबा, असे सांगितले जात आहे. काही ठेवीदारांनी न्यायालयात जातो, अशी धमकी दिली तर खुशाल जावा, असे सांगितले जात
आहेत.
भ्रष्टाचार करून अशाप्रकारे सर्वसामान्य जनतेची रक्कम गिळंकृत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तो अत्यंत धोकादायक आहे.
तेंव्हा संबंधित सोसायटीच्या संचालकांवर कारवाई करावी आणि रक्कम परत द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी इक्बाल जमादार, शहीद पटवेगार, सरफराज वडगावकर, अरीफ बागेवाडी, अब्दुलरेहमान, फैयाज तोडेवाले यांच्यासह इतर पिग्मी कलेक्टर्स उपस्थित होते.