नागरिकत्त्व कायदा हा देशाच्या हितासाठी असून भारतीयांनी याचा स्वीकार करावा असे आवाहन जिह्याचे पालकमंत्री आणि माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी केले. येथील जिल्हा क्रीडांगणावर झालेल्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे या नात्याने ते बोलत होते. त्यांनी आपल्या भाषणात विविध मुद्यांचा परामर्श घेतला.
कर्नाटक राज्य प्रगतीपथावर असून सरकारच्या विविध योजनांची कार्यवाही योग्य रीतीने करण्यात येईल. त्याचप्रमाणे त्यांच्या पुनर्वसनासाठी विविध योजना राबविण्याला प्रथम प्राधान्य देण्यात येईल अशी ग्वाही दिली.
येथील जिल्हा क्रीडांगणावर पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी आमदार अनिल बेनके, मुख्यमंत्र्यांचे सचिव शंकरगौडा पाटील, जि. पं. अध्यक्षा आशा ऐहोळे, बुडाचे अध्यक्ष जी. बी. होसमनी, जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोम्मन हळ्ळी, जि .पं. चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. के. व्ही. राजेंद्र, पोलीस आयुक्त बी. एस. लोकेश कुमार, जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निम्बर्गी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थी वर्गासह एन.सी.सी. छात्रांनी शानदार संचलन केले. तसेच पोलीस पथकाने मान्यवरांना मानवंदना दिली. या कार्यक्रमाद्वारे देशभक्तीपर उपक्रमांचा सोहळा पार पडला. देशाच्या स्वातंत्र्य लढय़ात योगदान दिलेल्या ज्ये÷ स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार यावेळी करण्यात आला. कार्यक्रमाला शालेय विद्यार्थ्यांसह निमंत्रित मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते.