23 जण जखमी, मजुरी करुन परतताना काळाचा घाला
प्रतिनिधी /बेळगाव
सौंदत्तीजवळ शुक्रवारी रात्री झालेल्या भीषण अपघातातील मृतांचा आकडा सातवर पोहोचला असून या अपघातात 23 जण जखमी झाले आहेत. धारवाड जिह्यातील मोरब येथे मोलमजुरी करुन गावी परतताना या मजुरांवर प्रुर काळाने घाला घातला आहे.
सौंदत्ती पोलीस स्थानकात या अपघाताची नोंद झाली आहे. महिंद्रा बोलेरो व मॅक्सीकॅब आणि टाटाएस गुडस् वाहन असे तीन वाहनांची धडक बसून हा अपघात घडला आहे. या तिहेरी अपघातातील मृत चुंचनूर (ता. रामदुर्ग) येथील राहणारे होते.
मारुती तम्मान्ना पुजेरी (वय 31, रा. इटनाळ, ता. रायबाग), हनमव्वा मायाप्पा बोम्मण्णावर (वय 50), भीमव्वा सिध्दाप्पा नरी (वय 38), यल्लव्वा यल्लाप्पा मुरकीभांवी (वय 60), पारव्वा सुरेश हुरळी उर्फ गोडी (वय 35), रुक्मव्वा सिध्दाप्पा वडय़ाक्कण्णावर (वय 35), यल्लम्मा खानाप्पा दोडवाड (वय 60, सर्व रा. चुंचनूर) अशी मृतांची नावे आहेत.
तर या अपघातात नागव्वा भीमाप्पा जट्टण्णवर (वय 55), नागव्वा मंजू बोम्मण्णावर (वय 25), प्रेमा फकिराप्पा तुरमुरी (वय 16), ज्योती मारुती तुरमुरी (वय 26), रेणूका सिद्रायप्पा तुरमुरी (वय 32), बसम्मा सिद्रायप्पा तुरमुरी (वय 13), श्रुती यल्लाप्पा जन्नार (वय 13), रेणूका यल्लाप्पा जन्नार (वय 18), सुरेश बसाप्पा बोम्मण्णावर (वय 25), उद्दव्वा बसळीगुंदी (वय 20), रामनगौडा पाटील (वय 25), सावक्का कृष्णा बेनकट्टी (वय 28), मल्लव्वा मारुती किली (वय 28), प्रकाश हंणमतप्पा तेग्गीहाळ (वय 39), शट्टम्मा मारुती बेनकट्टी (वय 13), गंगव्वा केंचप्पा जन्नार (वय 50), मायव्वा गंगाप्पा जट्टेण्णावर (वय 22), गंगाप्पा शिवारायप्पा जट्टेण्णावर (वय 32), नेत्रा बसाप्पा पटात (वय 13), बसवराज मारुती बेनकट्टी (वय 9), शांतव्वा बसाप्पा पाम्मण्णावर (वय 42), गदग्याप्पा यल्लाप्पा जन्नार (वय 16), रत्नव्वा मारुती बेनकट्टी (वय 35) अशी जखमींची नावे आहेत. हे सर्व जण चिंचनूर (ता. रामदुर्ग) व जगबाळ (ता. सौंदत्ती) येथील राहणारे आहेत.