ऑनलाईन टीम / रियाध :
येत्या जूनअखेर देशातील स्थानिक पर्यटन सुरू करण्याची योजना सौदी अरेबियाने आखली आहे. सौदीचे पर्यटनमंत्री अहमद बिल अकील अल खातिब यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
खातिब म्हणाले, पर्यटन हा सौदीचा आर्थिक केंद्रबिंदू आहे. त्यामुळे निधी उपलब्ध होण्यासाठी कोरोना संकटातही पर्यटन सुरू करावे लागणार आहे. या मौसमात पर्यटनासाठी काही कार्यक्रम तयार केले आहेत. जूनअखेर स्थानिक पर्यटनावरील सर्व निर्बंध हटवण्यात येतील. त्यासाठी आरोग्य मंत्रालयाकडून परवानगी मिळण्याची वाट पाहत आहोत. आरोग्य मंत्रालयाची परवानगी मिळाल्यानंतर मक्का सोडून सर्व प्रकारची प्रेक्षणीय स्थळे आणि स्थानिक पर्यटन खुले करण्यात येणार आहेत.
कोरोना रुग्णवाढीच्या आकडेवारीत सौदी अरेबिया जगात 16 व्या क्रमांकावर आहे. सौदीत आतापर्यंत 1 लाख 45 हजार 991 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 1139 जणांचा मृत्यू झाला आहे. 93 हजार 915 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, 50 हजार 937 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.