जूननंतर आशियासाठी किमतीत प्रथमच कपात : उद्योग व्यवसाय कोरोनामुळे प्रभावीत
वृत्तसंस्था/ दुबई
सौदी अरबने आपल्या तेलाच्या किमती घटविल्या आहेत. यावरुन जगभरातील कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग तेल बाजारावर कशाप्रकारे प्रभाव टाकू शकतो, याचा अंदाज सध्या येत असल्याची माहिती आहे. सध्या तेलाच्या मागणीत पुन्हा घसरणीचा प्रवास सुरू आहे. यामुळे मार्चमध्येही सौदी अरबने आपल्या तेलाच्या किमती घटविल्या होत्या. त्यामुळे किमतीचे युद्ध सुरु झाल्याचे पहावयास मिळाले होते. त्यानंतर मात्र जागतिक कच्च्या तेलाच्या किमतीत विक्रमी घसरण नोंदवली होती.
सौदी अरबची सरकारी तेल कंपनी सौदी अराम्कोने जून महिन्यानंतर प्रथमच आशियासाठी आपल्या अरब लाइटची किमत 1.4 डॉलर प्रति बॅरेल घटविली आहे. त्यामुळे खरेदीदार देशांना दिलासा मिळणार आहे. त्यानंतर तेल किमत सौदी अरबकडून वापरासाठी उपयोग करण्यात येणाऱया बेंचमार्ककडून 50 सेंट कमी झाले आहेत.
अराम्कोने अमेरिकेकडून ऑक्टोबरमध्ये विकण्यात येणाऱया तेलाच्या किमतीत कपात केली आहे. एप्रिलनंतर अमेरिकेसाठी प्रथमच किमतीत कपात केली आहे. तसेच ऑगस्टमध्ये अमेरिकेला सौदी अरबची तेल निर्यात कितीतरी दशकांच्या नीचांकी पातळीवर आली आहे.
जगातील तेल मागणीत घट
कोरोनाच्या प्रभावामुळे जगातील व्यापार आणि सामाजिक जनजीवन थांबले होते. या कारणामुळे तेलाची मागणी मोठय़ा प्रमाणात घटली आहे. सौदी अरब, रशिया आणि अन्य ओपेकमधील सदस्यांमध्ये एप्रिलमध्ये तेल उत्पादन नियमितपणे 1 कोटी बॅरेल घटविण्यासाठी करार करण्यात आला होता. त्याच्यानंतर कच्च्या तेलाच्या किमती सावरल्याचे पहावयास मिळाले आहे.