जेद्दाह, सौदी अरेबिया
विद्यमान चॅम्पियन रेड बुलच्या मॅक्स व्हर्स्टापेनने चुरशीच्या शर्यतीत फेरारीच्या चार्लस लेक्लर्कला मागे टाकत सौदी अरेबियन ग्रां प्रि फॉर्म्युला वन शर्यतीचे
जेतेपद पटकावले. मर्सिडीजच्या कार्लोस सेन्झने तिसरे स्थान मिळविले.
मर्सिडीजच्या सर्जिओ पेरेझने 16 व्या लॅपपर्यंत आघाडी घेतली होती. पण त्याला शेवटी चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. हासच्या जॉर्ज रसेलने पाचवे, अल्फा रोमिओच्या एस्टेबन ओकॉनने सहावे, अल्पाईनच्या लँडो नॉरिसने सातवे, अल्फा टॉरीच्या गॅसलीने आठवे, अल्पाईनच्या मॅग्नसेनने नववे व अल्फा रोमिओच्या लेविस हॅमिल्टनने दहावे स्थान मिळवित एक गुण मिळविला.