ऑनलाईन टीम / रियाध :
सौदी अरेबियाने आता झिरो कार्बन उत्सर्जनावर भर दिला आहे. 2060 सालापर्यंत सौदी अरेबियाचा झिरो कार्बन ग्रीन हाऊसमध्ये समावेश होईल, असा दावा सौदीचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी केला आहे.
ग्लासगो, स्कॉटलँडमध्ये आयोजित केल्या जाणाऱया जागतिक हवामान परिषदेपूर्वीच सलमान यांनी हा दावा केला आहे. ते म्हणाले, जगाला हवामान बदलाच्या धोक्यांपासून वाचविण्यासाठी अनेक देश एकत्र आले आहेत. या मोहिमेत सौदी अरेबियाने सहभाग घेतला असून, झीरो कार्बन उत्सर्जनावर भर दिला आहे. झीरो कार्बन उत्सर्जन म्हणजे सौदी तेल उत्पादन बंद करणार असा नाही. जेवढा कार्बन उत्सर्जन होत आहे त्याचे प्रमाण शुन्यावर आणण हा असेल. मात्र, यूनायटेड नेशन्सच्या अकाऊंटिंग नियमांनुसार सौदी अरेबियातून निर्यात होणाऱया तेलामुळे परदेशांमध्ये जितकं कार्बन निर्माण होणार आहे, त्याला आम्ही जबाबदार नसणार असे मोहम्मद बिन सलमान यांनी म्हटले आहे. 2060 सालापर्यंत सौदी अरेबियाचा झीरो कार्बन उत्सर्जन करणारा देश असेल.