बेळगाव : नुकत्याच जाहीर झालेल्या दिवाणी न्यायाधीश परीक्षेत नित्यानंद कॉलनी टिळकवाडी येथील रहिवासी सौम्या बेंजामीन हुली यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. बिम्स येथील मार्फसी विभागाचे निवृत्त अधिकारी बी. बी. हुली व जिल्हा मलेरिया विभागाच्या अधीक्षिका सौम्या हुली यांच्या त्या कन्या आहेत.
सौम्या यांनी टिळकवाडी येथील डिव्हाईन प्रॉव्हिडन्स स्कूलमधून प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेतले आहे. आर. एल. लॉ कॉलेजमधून एलएलबीची पदवी त्यांनी घेतली. दिवाणी न्यायाधीश परीक्षेत त्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.