मानवाला माहिती असलेल्या विश्वात पृथ्वी हा एकच ग्रह असा आहे, की ज्यावर जीवसृष्टी आहे आणि विशेषतः मानवासारखी प्रगत प्रजाती आहे, असे आजवर मानले गेले आहे. तथापि, नासाने लावलेल्या शोधानुसार आपले सौरमंडलाबाहेर म्हणजेच सूर्यमालिकेच्या पलीकडे किमान पाच हजार ग्रह असे आहेत, की जेथे पृथ्वीसदृश वातावरण आढळून आले आहे. या ग्रहांपैकी काहींवर जीवसृष्टी असू शकेल आणि अशांपैकी मोजक्मया ग्रहांवर मानवासारखी प्रजाती निर्माण होण्यासारखे अनुकूल वातावरणही असू शकेल, असा खगोलशास्त्रज्ञांचा आशावाद आहे.
नासाचा हा शोध पृथ्वीला भावंड शोधण्याच्या प्रयत्नांमध्ये मैलाचा दगड म्हणून ओळखला जाण्याची शक्मयता आहे. पाच हजार पृथ्वीसदृश ग्रहांपैकी 65 ग्रहांवर अधिक लक्ष केंद्रित केले जात आहे. या ग्रहांपासून मिळणारे रेडिओ संदेश तेथे जीवसृष्टीसाठी अनुकूल स्थिती असल्याचे संकेत देतात. सध्या ही जीवसृष्टी कदाचित अतिसूक्ष्म जंतूंपुरतीच मर्यादित असू शकेल. तथापि, भविष्यकाळात या जीवसृष्टीची उत्क्रांती होऊन अधिक प्रगत जीव निर्माण होऊ शकतात. तथापि, हे ग्रह पृथ्वीपासून इतके दूर आहेत, की तेथे प्रत्यक्ष जाणे आणि परिस्थितीचे अवलोकन करणे हे सध्याची वैज्ञानिक मर्यादा लक्षात घेता अशक्मय आहे. तथापि, पृथ्वीवर बसूनच या ग्रहांवरील घडामोडींवर लक्ष ठेवले जात आहे.
सध्या तरी या ब्रम्हांडामध्ये पृथ्वीला कोणी भावंड नाही, याच सिद्धांतावर विश्वास ठेवला जात आहे. पण नवे शोध काही वेगळे संकेत देत असल्याने एक कुतूहल मात्र निश्चितच जागृत झालेले आहे, एवढेच सध्या म्हणता येते.