पोरबंद
गुजरातच्या सौराष्ट्र-कच्छ भागात गुरुवारी 6 तासांमध्ये 10 भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. पोरबंदरनजीक 7, जामनगरच्या लालपूरमध्ये 2 आणि कच्छमध्ये भूकंपाचा एक धक्का जाणवला आहे. या भूकंपाच्या धक्क्यांमुळे या भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परंतु भूकंपाच्या या धक्क्यांमुळे कुठल्याही प्रकारच्या नुकसानीचे वृत्त नाही. भूकंपाचे केंद्र जामनगरपासून 28 किलोमीटर अंतरावर होते.
पोरबंदरमध्ये मंगळवारी रात्री 12 वाजून 19 मिनिटांनी, 12:34, 1:26, 2:13, 2:54, 2:59 आणि पहाटे 6 वाजून 21 मिनिटांनी भूकंपाचे 8 धक्के जाणवले आहेत. भूकंपाच्या या धक्क्यांची तीव्रता 2.1 ते 3.3 दरम्यान राहिली आहे. तर जामनगरच्या लालपूरमध्ये रात्री उशिरा 2 वाजून 21 मिनिटांनी आणि 2.59 वाजता 2.5 तीव्रतेचे धक्के जाणवले आहेत. तर कच्छमध्ये सकाळी 6 वाजून 10 मिनिटांनी 2.3 तीव्रतेचा धक्का बसला आहे.