नवी दिल्ली
भारताने जानेवारी ते मार्च 2022 या कालावधीत 3 हजार मेगावॅट क्षमतेची सौर ऊर्जा निर्माण केली असल्याची माहिती मेरकॉम इंडिया या संस्थने दिली आहे. अलीकडेच सदरच्या कंपनीने यासंबंधीची पाहणी केली होती. त्यात भारताने सदरच्या तिमाहीत मागच्या वर्षाच्या तुलनेत 50 टक्के इतकी अधिक सौर ऊर्जा निर्माण केल्याची बाबही स्पष्ट झाली आहे. मागच्या वर्षी समान अवधीत 2 हजार मेगावॅट सौर ऊर्जा तयार करण्यात आली होती.