प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगावमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्केटींगरिंग निर्माण करावे तसेच खेळामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱया खेळाडूंना मदत करावी. क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन द्यावे, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी होणाऱया गर्दीवर नियंत्रण ठेवावे, यासाठी स्केटींगपटूंनी गोवावेसपासून स्केटीग करत जिल्हाधिकारी कार्यालय येथे येवून जिल्हाधिकाऱयांना निवेदन दिले.
बेळगाव जिह्यातील स्केटींग खेळाडूंनी राज्य व राष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारली आहे. अनेक स्केटींगपटूंनी विश्वविक्रम केले आहेत. तेंव्हा स्मार्टसिटी अंतर्गत आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्केटींगरिंग निर्माण करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. कोरोनाचे रुग्ण कमी झाले तरी अजून धोका टळलेला नाही. तेंव्हा त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वांनीच सावधानता बाळगावी, असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
बाजारपेठ, विवाह समारंभ तसेच इतर कार्यक्रमांना गर्दी वाढत आहे. मात्र निष्काळजीपणा करु नये. हा आजार कधीही बळावू शकतो. तेंव्हा जनतेने काळजी घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले. कोरोनामुळे सर्वसामान्य जनता विविध अडचणींचा सामना करत आहे. आता कोरोनाची लस लवकरच उपलब्ध होणार आहे, तेंव्हा ती लस मोफतच द्यावी, अशी मागणी देखील या निवेदनात करण्यात आली.
अतिवेगाने वाहने चालवून अपघात घडत आहेत. तेंव्हा बेफान वाहने चालविणाऱयांवर कठोर कारवाई करावी, असेही या निवेदनात म्हटले आहे. यावेळी रोलर स्केटींग ऍकॅडमीचे प्रशिक्षक सुर्यकांत हिंडलगेकर, सुनील जाधव, सक्षम जाधव, नितीन जाधव, प्रथम राज, सदा शेख, यशपाल पुरोहित, आदर्श निकम, यशवर्धन परदेशी, अमेय याळगी, भरत पाटील, चिन्मय देसाई, सत्यम पाटील यांच्यासह इतर स्केटींगपटू उपस्थित होते.