वृत्तसंस्था/ ग्लॅस्गो
स्कॉटलंडचा मध्यफळीत खेळणारा फुटबॉलपटू बिली गिल्मूर याला कोरोनाची बाधा झाली असून तो युरो चषक फुटबॉल स्पर्धेत होणाऱया क्रोएशियाविरूद्धच्या सामन्यात खेळू शकणार नाही.
स्कॉटलंडचा तसेच चेल्सी क्लबकडून खेळणारा गिल्मूर याची रविवारी कोरोना चाचणी घेण्यात आली. या चाचणीत तो पॉझिटिव्ह आढळला. आता त्याला काही दिवसासाठी क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात येणार असल्याने स्कॉटलंड संघाला जबरदस्त धक्का बसला आहे. युरो चषक फुटबॉल स्पर्धेत शुक्रवारी झालेल्या सामन्यात स्कॉटलंडने बलाढय़ इंग्लंडला गोलशून्य बरोबरीत रोखले होते. या सामन्यात गिल्मूरला ‘सामनावीर’ म्हणून निवडण्यात आले होते.