अल अमेरात / वृत्तसंस्था
आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या पात्रता फेरीत स्कॉटलंडने त्यांच्यापेक्षा बलाढय़, अनुभवी बांगलादेशला पराभवाचा जोरदार धक्का देत खळबळ उडवून दिली. काईल कोएत्झरच्या नेतृत्वाखालील स्कॉटलंडने प्रारंभी 6 बाद 53 वरुन 9 बाद 140 धावांची जोरदार मजल मारली आणि प्रत्युत्तरात बांगलादेशला 20 षटकात 7 बाद 134 धावांवर रोखण्याचा पराक्रम गाजवला.
स्कॉटलंडतर्फे ख्रिस ग्रीव्हजने 28 चेंडूत सर्वाधिक 45 तर मार्क वॅटने 17 चेंडूत जलद 22 धावांचे योगदान दिले. मेहदी हसनने 19 धावात 3 बळी घेतले. प्रत्युत्तरात बांगलादेशला मुश्फिकूर (38), शकीब (20), महमुदुल्लाह (23) व होसेन (18) यांच्या फटकेबाजीनंतरही विजय मिळवता आला नाही. मेहदी हसनची 5 चेंडूतील नाबाद 13 धावांची खेळीही निष्फळ ठरली.