वृत्तसंस्था / ग्लॅसगो
भारताची अव्वल महिला फुटबॉलपटू बालादेवी हिने यापूर्वीच स्कॉटिश महिला प्रिमियर लिग फुटबॉल स्पर्धेत खेळण्यासाठी एका क्लबबरोबर करार केला होता. तिने रेंजर्स एफसी संघाबरोबर या स्पर्धेसाठी करार केला होता.
रविवारी या स्पर्धेतील झालेल्या रेंजर्स एफसी आणि मदरवेल एफसी यांच्यातील सामन्यात रेंजर्स एफसी संघाकडून खेळताना बालादेवीने या स्पर्धेतील आपला पहिला गोल नोंदविला. या सामन्यात रेंजर्स एफसीने मदरवेल एफसीचा 9-0 अशा गोलफरकाने एकतर्फी पराभव केला. रेंजर्स एफसी संघातर्फे ख्रिस्टी होवेट आणि लिझी ऑर्नोट यांनी शानदार हॅटट्रिक नोंदविली. युरोपमधील महिलांच्या व्यावसायिक फुटबॉल स्पर्धेसाठी करारबद्ध होणारी 30 वषीय बालादेवी ही भारताची पहिली फुटबॉलपटू ठरली आहे. तिने या क्लबबरोबर गेल्या जानेवारीत करार केला होता.