नवी दिल्ली
झेकची ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपनी स्कोडा ऑटो आपली नवी कुशाक मोटार पुढील महिन्यात म्हणजेच जूनमध्ये भारतीय बाजारात दाखल करणार असल्याचे समजते. जूनमध्ये ही गाडी बाजारात दाखल होणार असली तरी या गाडीची डिलिव्हरी मात्र जुलैमध्ये दिली जाणार असल्याचे स्कोडा ऑटो इंडियाचे संचालक झॅक होलीस यांनी सांगितले आहे. स्कोडा फॅबिया ही गाडी सध्या तरी भारतात लाँच करण्याचा कंपनीचा विचार नसल्याचे त्यांनी सांगून सध्या कुशाक गाडी भारतीयांसाठी उपलब्ध केली जाणार आहे. कॉम्पॅक्ट सुव्ह गटातील कुशाक क्रेटा, एस क्रॉस, हेक्टर, सेल्टॉस, किक्स, डस्टर या सारख्या मोटारींशी स्पर्धा करेल, असे सांगितले जात आहे.