नवी दिल्ली
नव्याने दाखल होणाऱया स्पोर्टस् युटिलीटी गटातील कुशाक गाडीचे भारतातच उत्पादन सुरु केले असल्याची माहिती स्कोडा ऑटो इंडियाने नुकतीच दिली आहे. सदरच्या गाडीची डिलिव्हरी जुलैमध्ये ग्राहकांना दिली जाणार आहे. भारतात महाराष्ट्रातील चाकण (पुणे) येथील कारखान्यात तयार होणारी कुशाक ही पहिलीवहिली कार ठरली आहे. स्कोडा ऑटो आणि फोक्सवॅगन ग्रुप यांच्या सहकार्यातून गाडीची निर्मिती केली जात आहे. यावर्षी मार्चमध्ये ही लाँच करण्यात आली होती.