मुंबई
अलीकडेच स्कोडाने आपल्या कुशाक या गाडीचे भारतात उत्पादन सुरु केले आहे. आता कंपनीने स्पोर्टस् युटिलीटी व्हेईकल गटातील नवी ‘कुशाक’ येत्या 28 जूनला भारतात ग्राहकांसाठी सादर करण्याचे निश्चित केले आहे. भारतातील सुव्ह गटात आता स्कोडाच्या ‘कुशाक’ची भर पडणार असून या गटात इतर कंपन्यांशी ती चांगलीच टक्कर देईल, असे कंपनीने म्हटले आहे. ‘कुशाक’ गाडीचे उत्पादन सुरू असले तरी सदरची गाडी ग्राहकांना कधी मिळणार अशी विचारणा सातत्याने होत होती. अखेर कंपनीने या गाडीच्या सादरीकरणाची तारीख 28 जून जाहीर केली आहे. क्रेटा, सेल्टॉस व टायगुन यांच्याशी ‘कुशाक’ची टक्कर असेल.