केएमटी वर्कशाॅपचा अनोखा उपक्रम, 13 लाखांच्या सीएसआर फंडातून उभारणी, 15 दिवसांत नागरिकांच्या सेवेत : पर्यटकासह स्थानिकांची गैरसोय टळणार
विनोद सावंत/कोल्हापूर
केएमटीने स्क्रॅढपच्या बसपासून हायटेक मोबाईल टाॅयलेट व्हॅनची (फिरते शौचालय) निर्मिती केली आहे. विशेष म्हणजे सीएसआर फंडातून मिळालेल्या 13 लाख रूपयातून याची उभारणी केली आहे. व्हॅनमध्ये पुरूष आणि महिला असे दोन स्वतंत्र विभाग केले आहेत. 15 दिवसांत ही व्हॅन नागरीकांच्या सेवेत दाखल होणार आहे.
कोल्हापुरला ऐतिहासिक महत्व आहे. येथे पर्यटनस्थळ आणि धार्मिक स्थळ असल्याने मोठय़ा प्रमाणात पर्यटक येतात. याचबरोबर उपनगरासह शहरातील नागरिकही खरेदीसाठी बाजारपेठेत येतात. शहरामध्ये काही ठिकाणी स्वच्छतागृहांचा अभाव आहे. यामुळे त्यांची गैरसोय होते. विशेषत महिलांसाठी स्वच्छतागृहांची संख्या फार कमी आहे. त्यांच्यासाठी स्वच्छतगृह उभारण्याचा विषय नेहमी चर्चेत येतो. प्रत्यक्षात कार्यवाही होत नाही. आता मात्र महापालिकेने केएमटीच्या स्क्रॅढप बसची मोबाईल टाॅयलेट व्हॅनची निर्मिती केली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.
स्क्रॅढपच्या बसचा असाही वापर
केएमटीच्या वर्कशाॅप विभागातील कर्मचाऱयांच्या कौशल्याने स्क्रॅढपच्या बसचा वापर पुन्हा केला जात आहे. त्यांनी कोरोनामध्ये ‘फिरता दवाखाना’ केला. त्याचा आजही उपयोग होत आहे. आता स्क्रॅढप बसपासून मोबाईल टाॅयलेट व्हॅन केली आहे.
प्रतिज्ञा उत्तरे यांचा पाठपुरावा
शिवसेनेच्या प्रतिज्ञा उत्तुरे पहिल्या महिला परिवहन समिती सभापती झाल्या. त्यांनी महिलांची समस्या ओळखून स्क्रॅढपच्या बसपासून मोबाईल टाॅयलेट व्हॅन करण्याची संकल्पना मांडली. त्यांच्या पाठपुराव्यामुळेच हे शक्य झाले.
मोबाईल टाॅयलेट व्हॅनमधील सुविधा
-महिलांसाठी चेंजींगरूम
-महिलांसाठी तीन शौचालय
-पुरूषासाठी तीन शौचालय
-पुरूषासाठी तीन मुतारी
-दोन्ही विभागात कमोडची सोय
-फॅनची सोय
-बसवर एक हजार लिटरच्या दोन टाक्या
-दोन्हीकडे वाॅशबेसीन
-एलईडी बल्ब. इन्व्हटर
-बसखाली ड्रेनेजच्या दोन टाक्या
सीएसआर फंडातून उभारणी
विशेष म्हणजे मोबाईल टायलेट व्हॅनसाठी महापालिका अथवा केएमटीला एक रूपयाचाही खर्च झालेला नाही. पुणे येथील कल्याणी टेक्नाॅलाॅजी या कंपनीच्या सीएसआर फंडातून ही व्हॅन उभारली आहे. त्यांनी 13 लाख रूपये यासाठी दिले.
मोबाईल व्हॅन पुढील 15 दिवसांत सेवेत
बसचा परवाना पॅसेंजरवरून फिरते शौचालय व्हॅनमध्ये ट्रन्स्फर करावा लागणार असून त्यासाठी केएमटी वर्कशाॅपने मुंबई येथील टीसी आॅफीसकडे प्रस्ताव दिला आहे. 15 दिवसांत हे प्रक्रिया पूर्ण होऊन आरोग्य विभागाकडे व्हॅन दिली जाणार आहे. गर्दी होणाऱया, पार्कींगच्या ठिकाणी व्हॅन लावली जाणार आहे. तसेच उत्सव, जत्रावेळी याचा वापर होणार आहे. मोठय़ा इव्हेंटसाठीही व्हॅन देण्याचे नियोजन आहे.
पी.एन.गुरव, प्रकल्प अधिकारी, केएमटी
निगा राखण्याची जबाबदारी नागरिकांची
महापालिकेने एखादी सेवा सुरू केल्यानंतर त्याची नासधुस होत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. लाखो रूपये खर्च करून मोबाईल टाॅयलेट व्हॅन तयार केली असून याची निगा राखण्याची जबाबदारीही आता नागरिकांची आहे. महापालिकेनेही याच्या देखभालीसाठी ही सेवा मोफत न देता अल्प आकारणी करणे योग्य ठरणार आहे.