सर्वसाधारणपणे निळ्या किंवा काळ्या रंगाची जीन्स नेहमीच घातली जाते. मात्र व्हाईट डेनिम किंवा पांढर्या रंगाची जीन्सही छान दिसते. ही जीन्स कॅरी करण्याच्या या काही खास टिप्स…
- बोल्ड तसंच सेमी फॉर्मल लूकसाठी ऑल व्हाईटचा पर्याय निवडायला हरकत नाही. या पेहरावासोबत काळ्या रंगाचे बूट घालता येतील.
- स्टायलिश स्मार्ट कॅज्युअल लूकसाठी पांढर्या जीन्सवर शर्ट किंवा टी शर्ट घालून त्यावर ब्लेझर कॅरी करता येईल.
- पांढर्या जीन्सवर फिकट रंगाचे शर्ट शोभून दिसतील. स्ट्राईप्सवाले रंगीत शर्टही छान दिसतील.
- पांढर्या रंगासोबत अनेक कॉम्बिनेशन्स करता येतील. या जीन्सवर प्रिंटेड टॉप घाला. लाल, निळ्या किंवा हिरव्या रंगाचे बॉटनिकल प्रिंटचे शर्टही शोभून दिसतील. ज्यॉमेट्रिक प्रिंट,फ्लोरल प्रिंटही कॅरी करायल हरकत नाही.
- पांढरी जीन्स खरेदी करताना मिनिमल स्ट्रेचिंगवाली 100 टक्के कॉटनची जीन्स कॅरी करा. जास्त स्ट्रेचिंगवाली जीन्स पांढर्या जेगिंगसारखी दिसेल. त्यामुळे जास्त स्ट्रेच टाळा.