साहित्य : 4 मध्यम आकाराचे बटाटे वाफवून, 3 चमचे चीज किसून, अर्धा चमचा ओवा, 1 चमचा धणे-जिरे पावडर, 1 चमचा कॉर्नफ्लोर, 1 वाटी बेडक्रम्स, पाव वाटी मेयॉनीज, 1 चमचा लाल तिखट पावडर, 2 चमचे कोथिंबीर चिरून, पाव चमचा आमचूर पावडर, चवीपुरते मीठ, तेल आवश्यकतेनुसार
कृती : वाफवलेले बटाटे सोलून मॅश करावेत. त्यात लाल तिखट पावडर, धणे-जिरे पावडर, आमचूर पावडर, कोथिंबीर, ओवा आणि मीठ घालून मिश्रण मिक्स करून मळून घ्यावे. थोडय़ाशा पाण्यात कॉर्नफ्लोर मिक्स करून त्याची पातळ पेस्ट बनवावी. हाताला तेल लावून बटाटय़ाच्या गोळय़ाचे मध्यम आकाराचे गोळे करावेत. त्याला चपटा आकार देऊन त्याच्या मधोमध खोलगट खड्डा करावा. त्यात चमच्याने मेयॉनीज घालून वरून किसलेले चीज घालून तोंड बंद करावे. तयार कटलेट कॉर्नफ्लोरच्या पेस्टमध्ये घोळवावे. नंतर बेडक्रम्समध्ये घोळवून गरम तेलात सोनेरी रंगावर तळावेत. तयार स्टफ्ड कटलेट सॉससोबत खाण्यास द्या.