1,250 कोटी रुपये उभारण्याची कंपनीची योजना
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
अब्जाधिश व्यावसायिक अनिल अग्रवाल हे आपली कंपनी स्टरलाइट पॉवर ट्रान्समिशनचा आयपीओ बाजारात आणणार आहेत. आयपीओच्या आधारे कंपनी जवळपास 1,250 कोटी रुपये उभारणार असून भांडवली बाजार नियामक सेबी यांच्याकडे प्रस्ताव सादर केला आहे.
कंपनीने याकरीता परवानगीसाठी अर्ज सेबीकडे सुपूर्द केला आहे. आयपीओच्या मदतीने कंपनी एकूण 1,250 कोटी रुपयांचे इक्विटी समभाग सादर करणार आहे. सदरच्या सादरीकरणामध्ये कंपनीच्या कर्मचाऱयांसाठी समभाग आरक्षीत ठेवणार आहे.
आयपीओचा निधी देणी फेडण्यासाठी
कंपनी आयपीओच्या मदतीने जमा होणाऱया रकमेचा वापर हा प्रामुख्याने उधारी देण्यासाठी करणार असल्याची माहिती आहे. कंपनी आयपीओच्या अगोदर 220 कोटी रुपये खासगी नियोजनावर विचार करण्याची शक्यता आहे. म्हणजे खासगी नियोजनाचा विचार केल्यास आयपीओचा आकार कमी राहण्याचे संकेत सांगितले जात आहेत.