मुंबई
अनिल अग्रवाल यांच्या स्टरलाईट पॉवर ट्रान्समिशनला आयपीओ सादर करण्यासाठी परवानगी दिलेली आहे. बाजारातील नियामक सेबीने स्टरलाईटसोबत ईएसडीएस सॉफ्टवेअर सोल्यूशन यांनाही आयपीओ सादर करण्यासाठी परवानगी दिली असल्याचे समजते. या दोन्ही कंपन्यांनी ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये सेबीकडे आयपीओ सादर करण्यासंदर्भात रीतसर अर्ज सादर केला होता. सेबीने स्टरलाइटपॉवरला दोन डिसेंबर रोजी आणि ईएसडीएसला 3 डिसेंबर रोजी आयपीओ सादरीकरणासाठी परवानगी बहाल केली आहे.