वृत्तसंस्था/ माद्रीद
येथे पुढील आठवडय़ात सुरू होणाऱया स्टुटगार्ट खुल्या महिलांच्या क्लेकोर्ट टेनिस स्पर्धेतून पोलंडची 19 वर्षीय महिला टेनिसपटू इगा स्वायटेकने माघार घेतली आहे. सदर माहिती स्वायटेकने स्वतःच्या ट्विटरवर प्रसिद्ध केली आहे.
पोलंडच्या स्वायटेकने प्रेंच ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेचे विजेतेपद यापूर्वी मिळविले आहे. 2021 सालातील प्रेंच ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धा 30 मे पासून सुरू होणार असल्याने स्वायटेकने या स्पर्धेवर अधिक लक्ष केंद्रीत करून जेतेपद स्वतःकडे ठेवण्यासाठी तिने स्टुटगार्ट टेनिस स्पर्धेतून माघार घेतली आहे. या स्पर्धेसाठी तिने आतापासून जोरदार सरावाला प्रारंभ केला आहे.