नवी दिल्ली
देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक स्टेट बँक ऑफ इंडियाच्या उपव्यवस्थापकीय संचालकपदी नितीन चग यांची निवड करण्यात आली आहे. यासोबतच चग हे डिजीटल बँकिंगचे मुख्य हे पदही सांभाळणार आहेत. डिजीटल माध्यमातून ग्राहकांना सेवा देण्याच्याबाबतीत चग यांना लक्ष घालावे लागणार आहे. नवी डिजीटल धोरणे आत्मसात करावी लागणार आहेत. डिजीटल बँकिंग क्षेत्रातले चग हे तज्ञ असून गेल्या तीन दशकांचा त्यांना अनुभव आहे.