मुलांच्या शिक्षण, लग्नासह अन्य बाबींसाठी करता येणार तरतूद
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
स्टेट बँकेने म्युच्युअल फंडअंतर्गत गुंतवणूकदारांसाठी नवीन गुंतवणूक प्लॅन सादर केला आहे. एसबीआय मॅग्नम चिल्ड्रन बेनीफिट ऍण्ड इन्वेस्टमेन्ट ऑप्शन या नावाने प्लॅन सादर करण्यात आला आहे. सदर योजना केलेल्या गुंतवणुकीमधून मुलाचे भविष्य सुरक्षित व उज्वल करण्यासाठी असल्याचे सांगण्यात आले.
सदर गुंतवणूक योजना सुरु करण्यात आली असून 22 सप्टेंबरला बंद करण्यात येणार असल्याची माहिती आहे. आपल्या भांडवलाचा 100 टक्के वाटा ईटीएफमध्ये करण्यात येण्याची शक्मयता आहे. म्हणजे फंड आपल्या भांडवलास कमी करुन 65 टक्क्मयापासून 100 टक्क्मयांपर्यंत इक्विटी एक्सचेंज टेडेड फंड्समध्ये गुंतवणूक करणार आहे. तसेच गुंतवणुकीचा 35 टक्के वाटा हा आंतरराष्ट्रीय इक्विटी आणि 20 टक्के गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवण्याची संधी योजनेत सहभागी होणाऱयांना मिळण्याची शक्मयता आहे. डेट फंडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी ट्रिपल ए रेटेड सिक्मयुरिटीमध्ये पैसे लावता येणार असल्याची माहिती आहे.
पाच वर्षांसाठी लॉक इन पीरियड एसबीआय मॅग्नम चिल्ड्रन बेनीफिट फंड इन्वेस्टमेन्ट योजनेवर राहणार आहे. यामध्ये मुल 18 वर्षाचे झाल्यावर रक्कम काढता येणार आहे. नवीन म्युच्युअल फंड 1 ते 14 वर्षाच्या कालावधीपर्यंत उपलब्ध होणार आहे. त्यामुळे कोणत्याही पालकांना आपल्या मुलांच्या भविष्यासाठी जोड खाते काढून गुंतवणूक करता येते.