ऑनलाईन टीम / मेक्सिको सिटी :
मेक्सिकोच्या चियापासमधील दक्षिण-पूर्व मेक्सिकन शहराच्या गुटिएरेझजवळ ट्रक उलटल्याने भीषण अपघात झाला. या अपघात 49 जण जागीच ठार झाले तर 58 जण जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गुरूवारी रात्री उशीरा चियापासकडे जाणाऱ्या महामार्गावर हा अपघात अपघात झाला. स्थानिक बचाव पथकाने ही माहिती दिली आहे.
अपघातग्रस्त ट्रकमध्ये जवळपास 100 मध्य अमेरिकेतील स्थलांतरित लोक होते. हे स्थलांतरित मध्य अमेरिकन देशांच्या गरिबी आणि हिंसाचाराने भरलेल्या वातावरणातून सुटण्यासाठी मेक्सिकोमार्गे अमेरिकेच्या सीमेवर पोहोचण्याचा प्रयत्न करतात. अशाच प्रकारे हे लोक ट्रकमधून जात होते. दरम्यान, गुरूवारी रात्री उशीरा चियापासकडे जाणाऱ्या महामार्गावर ट्रक उलटला. यात 49 नागरिकांचा जागीच मृत्यू झाला. तर 58 जण जखमी झाले आहेत. त्यामधील 3 जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येते. त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अद्याप मृतांची कोणतीही ओळख पटलेली नाही. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच, मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते.
चियापासचे गव्हर्नर रटिलियो एस्कंडन यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रति दु:ख व्यक्त करत अपघातासाठी जबाबदार असलेल्यांवर कडक कारवाई करण्याचं आश्वासन दिले आहे.