प्रतिनिधी/ सातारा
साता-यात गेल्या अनेक वर्षापासून परप्रांतीय मजूर काम करत होते, मात्र कोरोनामुळे काम बंद झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. लाँकडाऊनच्या काळात काही परप्रांतीय कामगार स्वगृही गेले आहेत. जे अजून कामगार जाण्यास इच्छुक आहेत. त्यांच्यासाठी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाकडून आँनलाईन नावनोंदणीची प्रक्रिया सुरु असल्याचे सहाय्यक कामगार आयुक्त संजय महानवर यांनी सांगितले.
महानवर म्हणाले, साता-यात 4 हजार पेक्षा जास्त परप्रांतीय कामगार होते. काही कामगार आपल्या कुटुंबासह राहत होते. लाँकडाऊनच्या काळात काम बंद झाले. आणि यांच्यावर उपासमारीची वेळ आली. या कामगारांनी पुन्हा त्यांच्या स्वगृही जाण्यास परवानगी मिळताच. काही एसटी बसने, रेल्वेने आपल्या स्वगृही गेले आहेत. कोरोनाचा वाढता विळखा कमी होईपर्यंत जे कामगार अद्याप साता-यात आहेत. त्यांना परत जाण्याची सोय करण्यात येणार आहे. https://migrant.mahabocw.in/migrant/form यासाठी आँनलाईन वेबसाईटवर नावनोंदणी करायची आहे. येत्या 31 जुलै पर्यत नावनोंदणी करता येणार आहे.